आरूबेटे
आरूबेटे : इंडोनेशियाच्या मोल्यूकस प्रांतातील पूर्वेकडील द्वीपसमूह. हा पश्चिम न्यू गिनीच्या दक्षिणेस आहे. ६० १०' द. १३४०२०' पू.; क्षेत्रफळ ८,५५३ चौ. किमी.; लोकसंख्या २९,६०४ (१९६१). या द्वीपसमूहात तानाबेसार या ९३ किमी. रुंद व १३४ किमी. लांब बेटाशिवाय १०० लहान बेटांचा समावेश होतो.